Link: भाग चौथा
भाग पाचवा: कॉलेजचं शेवटचं वर्ष
पाच मिनिटे उशिराने स्म्रीति वर्गाच्या दरवाजाशी येऊन थांबते. लेक्चररची परवानगी घेत ती आत येते. लेक्चरर पुन्हा ब्लॅकबोर्ड कडे (जो की रंगाने हिरवा असतो) वळत कुठल्यातरी प्रोग्रामचं अल्गोरिदम लिहायला सुरुवात करतात.
पहिली संपूर्ण रांग, शेवटची संपूर्ण रांग आणि चौथ्या रांगेतील एक बाक सोडला तर बसायला कुठेच जागा नसते.
DAA (अर्थात, Design and Analysis of Algorithms) तसा मार्क्स मिळवण्यासाठी म्हणायचं झालं तर खूप सोपा विषय. समजून घ्यायला मात्र तितकाच किचकट. कुठल्याही कम्प्युटर प्रोग्रामचं आधी अल्गोरिदम समजलं की कोडींग अगदी सहज सोप्या पद्धतीने लगेचच जमून जाते.
त्या विषयाला शिकवणारे लेक्चरर मात्र पूर्ण अल्गोरिदम त्या ब्लॅक बोर्ड वर लिहायचे आणि मग त्या अल्गोरिदम ला समजावून देण्यात धन्यता मानायचे. थोडक्यात, रट्टा कसा मारावा याची शिकवणच.
त्यांच्याकडे तसंही कुणी लक्ष देत नसायचं. आपल्यातच गुंतलेले असायचे सारे. कुणी प्रॅक्टिकलचं असाइनमेंट लिहिण्यात गुंतलेलं. कुणी कुठलीतरी कादंबरी वाचण्यात गुंतलेलं. कुणी मोबाईल फोन मध्ये गुंतलेलं. कुणी ब्लॅकबोर्ड कडे बघत कुठल्यातरी विचारात गुंतलेलं. कुणी बाकावर डोकं टेकून झोप काढण्यात गुंतलेलं. सगळेच वर्गात हजर असायचे ते फक्त आणि फक्त अटेंडन्ससाठी.
थोडक्यात, शेवटचे वर्ष असल्याने पुढे प्रोजेक्टचा लोड वाढेल आणि त्यासाठी लेक्चर्स सुद्धा बंक करावे लागतीलच. म्हणून सुरुवातीलाच अटेंडन्स अगदी व्यवस्थित राहावी, त्यामुळे सगळेच हजर.
DAA चे लेक्चरर मात्र हे सगळं माहित असूनही उगाच इतर लेक्चरर्स प्रमाणे कुठल्या मर्यादा टाकत नसत. तेही हसत खेळत एक तास संपवायचे आणि त्यामुळेसुद्धा सगळ्यांना त्यांचं लेक्चर बुडवायची इच्छा होत नसे.
स्म्रीति चौथ्या रांगेतल्या बाकावर बसून तिच्या स्वलिखित नोट्सना उघडते न उघडते तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो,
'May I come in sir?'
प्रियांश वर्गात येतो. स्म्रीति जवळ असलेली जागा आणि मागच्या पुढच्या दोघं बाकांवरच्या जागा सोडल्या तर त्याला बसायला कुठेच जागा नसते. चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणत, हृदयाचा ठोका बदलण्याआधी तो ठरवतो.
हलके पाऊलं टाकत तो स्म्रीति जवळ जाऊन बसतो.
आज तो आणि ती म्हणजे,
नवा सुगंध, नवा स्वाद
वा नवा रंग, नवा वाद
यापलीकडे काही घडेल
तर ते काहीसं असेल खास.
स्म्रीति त्याच्याकडे अगदी रागात बघते. खरंतर मनातून ती खूप चिडलेली असते.
त्यात अर्धा तास सुद्धा झालेला नसेल त्यांच्या रूम मधल्या वादाला. आत्ता वादाचे कारणच शेजारी येऊन बसल्याने तिची आतल्याआत होणारी घुसमट साहजिक होती.
त्यात तिच्या डावीकडील रांगेतल्या तिसऱ्या बाकावरून दोन व्यक्तींच्या चिडक्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या.
'एवढंच लेक्चर फक्त.' इतकंच काय ती त्या दोघींना ऐकू जाईल या भाषेत सांगते. साहजिकच दोघींचा रिप्लाय नकोच ऐकायला म्हणून ती बाकावर डोकं टेकते.
'खरं सांगायचं तर त्या दोघींनाच नाही, साऱ्या वर्गाला सांगू शकतेस की एवढंच लेक्चर तू इथे माझ्या शेजारी बसणार आहेस म्हणून.' प्रियांश अगदी सहजच एवढं बोलून गेला.
'का म्हणून?' तिने राग दाखवत त्याला विचारलं.
'कारण जितक्या भुवया त्या दोघींनी उंचावल्या आहेत तितक्याच इतरांनीही.' प्रियांश.
'तू का बसलास इथे?' ती इतकं बोलून थांबली पण तो काही बोलणार त्याआधीच ती म्हटली,
'कालचा दिवस काय कमी होता का? आता लेक्चर संपेपर्यंत एक शब्दही बोलू नकोस तू.' प्रियांश फक्त हसला.
'कालचा दिवस तुझ्या project lead चा होता. तिला आठवणीने विचार की तिच्या शरीरातल्या नसांतून रक्त वाहतं की फक्त माझ्यासाठी विनाकारण असलेला राग.'
'श्श! एक शब्दही नाही ऐकायचाय मला आत्ता.' ती इतकं बोलून त्याला शांत करते.
नेहमी बडबड करत असणाऱ्या प्रियांशला विरुद्ध टोकाचा स्वभाव असणाऱ्या स्म्रीतिसमोर नमतं घ्यावंच लागणार होतं. एकतर त्याला उणाड समजणाऱ्या group चा ती हिस्सा असली तरी त्यांच्यात आदल्यादिवशी सुरू झालेल्या project चा वाद पुढे वाढला तर तेव्हा त्या चौघींपैकी कुणीतरी शहाणं वागणारं म्हणून तो तिच्याकडे बघत होता.
स्म्रीति सकाळी अभ्यासलेलं DAA चं अल्गोरिदम समजून घेण्यात गुंतलेली.
प्रियांश मात्र तिच्याकडे बघत होता. तीन वर्षांत जणू तो तिला पहिल्यांदाच बघत होता. वहीवर काहीतरी लिहीतानासुद्धा त्याचं लक्ष मात्र तिच्यावरून काही हटेना.
ते तिचे काळे, दाट आणि चमकदार केस त्या ponytail hairstyle मुळे तिच्या उभ्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला सोपं करत होते. तो तिच्या शरीराचा गोरा रंग. ती काळेभोर डोळे तितकेच आकर्षक. तिचं ते तिच्या उभ्या चेहऱ्याला शोभून दिसेल असं धारदार नाक. आणि कुठेतरी हरवलेलं मन.
त्याला पहिल्यांदा आयुष्यात कविता लिहीण्यासाठी शब्दच सुचत नव्हते आणि जे सुचले ते काही केल्या कविता म्हणून शोभत नव्हते.
वहीच्या एका पानावर बरीच खोडाखाड केल्यानंतर पुन्हा एका नवीन पानावर तो शब्द जुळवू लागला. कागदं वाया गेल्याशिवाय नव्या कोऱ्या कागदावर लिखाणाचं महत्त्व फुललेलं दिसून येत नाही.
वेळ जात होता. शब्द जुळत होते, सुचत होते. लेक्चरर काहीतरी बडबड करत होते. सगळेच आत्ता हळूहळू कंटाळले होते.
'एवढं काय बघतोय?' स्म्रीतिनेही शेवटी न राहून प्रियांशला विचारलंच.
तिचंही लक्ष त्या वेळात त्याच्याकडे जात होतं. कविता आणि छोट्या-मोठ्या कथा लिहीण्याची आवड असणारा प्रियांश समोरच्याच्या मनातलंही लिहायचा, हे ती जाणून होती.
अर्थात, त्याच्यासाठी वेड्या असणाऱ्या कॉलेजच्या मुलींचा तिला आणि जन्काला वाटणारा मुर्खपणा खरंतर तिलाही जाणवला. तरीही, तो मुर्खपणा नव्हताच हे मात्र ती स्वतःला पटवू शकणार नव्हती. तो इतरांपेक्षा वेगळा होता हे मात्र तिला नक्की जाणवलं होतं.
'बघतोय की थॉमस कॉरमनची एवढी किचकट भाषा कशी समजत असेल तुला.' प्रियांश.
'तुला कसं कळलं की कॉरमनच्या रेफरन्स बुक मधून काढलेल्या या नोट्स आहेत म्हणून?' स्म्रीति त्याला techmax सोडून इतर कुठल्या पुस्तकातून अभ्यास न करणाराच समजत होती.
'अगं ती इंग्लिश बघ, किती कठीण वाटतेय. नाही म्हणजे तुला कळत असेल तर चांगलंच आहे पण खरच समजतं का गं त्यातून?' प्रियांश.
'तुझ्या माहितीसाठी मी आपल्या क्लासची फिफ्थ टॉपर आहे.' स्म्रीति.
'तर? त्याचा अर्थ असा होत नाही की तुला कॉरमनची भाषा सहज समजत असेल.' प्रियांश.
'काहीही.' स्म्रीति.
'बघ तू लिहीलेलं. असं वाटतंय सरसकट कॉपी-पेस्ट केलंय.'
'मी जेवढं लिहिलंय तेवढं मला समजलंय.'
'मग सांग, इथे (n-1) का घेतलाय?'
त्याला तिने अगदी व्यवस्थित, कॉरमनच्याच इंग्रजीत सांगितलं.
'फक्त n घेतला असता तर नसतं का चाललं?' प्रियांशने तिने लिहीलेल्या त्या अल्गोरिदमकडे बघत विचारलं.
'अं... मला वाटतं की नाही चालणार.' ती गोंधळलेल्या स्वरात म्हटली.
'तुला असं वाटतं?' त्याला हसायला आलं, 'थोडक्यात कॉरमन सुद्धा आपल्या लाडक्या सरांचा शिष्य दिसतोय, जेवढं आहे syllabus मध्ये तेवढंच समजून घ्या सांगणारा.' त्याचं हसणं काही थांबेना.
'अगं नाहीच वापरता येणार.' प्रियांशने मग स्म्रीतीला n घेतला तर काय काय चुकेल हे समजावलं.
'हे तर कॉरमनच्या मेथड पेक्षाही सोपं वाटतंय.' तिचं असं बोलणं ऐकून तो आणखी हसला.
'म्हणूनच तुझी rank पाचवी आहे. पहिली नाही.'
मर्मावर बोट ठेवला की कुणालाही त्रास होतोच. नेहमीच मोठ्या अपेक्षा ठेवणाऱ्या स्म्रीतिला त्याचं बोलणं खरं असलं तरी खटकलंच.
'तू पहिल्या दहांत तरी आहेस का रे?' ती थोडं चिडतच त्याला विचारते.
'पहिल्या विसांतही नाहीये खरंतर. पहिल्या दहांत येणं फार कठीण नसतं हे मात्र आज कळलंय.' तो तिच्या मर्मावर पुन्हा बोट ठेवत होता.
'पण जेवढे मार्क्स हवेत ना तेवढे तर काढणारच.' प्रियांश.
'तर मग लक्ष दे तुझ्या स्वतःच्या मार्क्सवर, नाहीतर केटी लागायची.' स्म्रीति.
तो हार मानेल तर ना.
'मला थोडे ना तुझ्यासारखी पहिलं येण्याची स्वप्नं पडतात.'
ती शांत होते, चेहऱ्यावर राग नसतो तर दिसत असतात खूप साऱ्या शंका.
'तसंही तुला पहिली जी Papa's girl आहे, थोडक्यात termwork च्या जोरावर पुढे असणारी आणि तिसरी असलेली तुझी project lead या दोघींचीच स्पर्धा असेल, वर्षभर.'
'का? आपल्या class चा default topper संन्यास घेतोय का आणि त्याच्यासोबत चौथा असलेला तुझा project partner कुंभमेळ्याला जातोय का?
'तू पण ना! ऐकूणच...' तो आणखी काही बोलणार त्याआधीच लेक्चररच्या अटेंडन्स घेण्याचा आवाज ऐकू येतो.
'Roll no. 12? Roll no. 12? Roll no. 12?'
'Roll no. 12, present sir!' प्रियांश ओरडतो.
'अर्थात प्रियांश, तू अभ्यासाच्या टिप्स घेण्यात busy असणार स्म्रीति मॅडमांकडून.' लेक्चरर असं म्हणताच साऱ्या वर्गात जोरदार हास्यकल्लोळ.
सगळ्यांना शांत करत ते इतरांची अटेंडन्स घेण्यात मग्न होतात. Roll no. 16 स्म्रीतिचा असल्याने ती कुठलीच reaction देत नाही त्याक्षणी.
ती टिप्स देण्यात मग्न नव्हती हे मात्र तिने लगेचच present sir म्हणत आपलं लक्ष ठिकाणावर असल्याचा अघोषित प्रयत्न केला.
'Thanks for the embarrassment! मी जाते पुढे बसायला.' रागातच ती तिच्या नोट्सना एकत्र करत असते.
'तू बस इथेच, मी जातो.' असं म्हणत लेक्चरर गेल्यागेल्या तो पुढच्या लेक्चरसाठी पहिल्या बाकावर बसतो, वहीचं एक कागद तिथेच विसरून.
तिने तो कागद बघितला. त्याला ओरडून सांगावं वाटत होतं तिला की ती इतरांसारखी मुर्ख नव्हती पण तिच्या स्वभावात ना ओरडणं होतं नाही पुढचं लेक्चर घेत असलेल्या लेक्चररसमोर ओरडण्याची हिंमत.
मनात कितीदा तरी स्वतःला नाही म्हणत तिने त्या कागदावर लिहिलेली कविता वाचलीच. अर्धवट जुळलेल्या शब्दांच्या त्या कवितेतून तिला जो सारांश कळायचा तो कळला.
असंच अचानक एकेदिवशी
तिची न त्याची मैफिल भरली
कल्लोळातील अपुर्व शांतता
क्षणभर मध्येच उभी राहिली
रागावलेले मन हे तिचे
तितकीच बावरलेली स्वप्नंही
गुंतासगळे संवाद गुंतीचेच
तरी उलगडत गेलं बरंच काही...

Nice Bhau
ReplyDeleteThank you :)
Deleteअसंच अचानक एकेदिवशी
ReplyDeleteतिची न त्याची मैफिल भरली
कल्लोळातील अपुर्व शांतता
क्षणभर मध्येच उभी राहिली
Awesome
Thank you :)
ReplyDelete