सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Thursday, 21 March 2019

भाग सातवा

Link: भाग सहावा



भाग सातवा: कॉलेजचं शेवटचं वर्ष




Image Source: Geulgram

'Facebook चा जमाना येऊनसुद्धा आपलं Orkut काही सुटायचं नाही.' प्रियांशने orkut.com वर login करताच समीर हसायला लागला‌.

रात्रीचे 11.30 वाजलेले. प्रियांशला रूममध्ये येऊन अर्धा तासंही झाला नव्हता. दोन दिवसांनंतर प्रियांश आणि त्याच्या group ला project चं presentation साऱ्या computer department च्या professors समोर द्यायचं होतं.

गेल्या अर्ध्या तासापासून तो आणि समीर त्याच्या presentation च्या slides मध्ये थोडेफार graphics changes करत बसलेले.

'आपलं Orkut सुटलं तर मात्र ते लवकरच बंद पडेल.' प्रियांश browser ला reload होण्याची वाट बघत म्हटला.

Orkut वर असणाऱ्या संदीप खरेंच्या community मधील complete this line... या thread वर दोघंही कविता लिहीत असायचे. ते एक कारण सोडलं तर त्यांच्यासाठी Orkut बंद होण्यातंच जमा होतं.

'हे मात्र खरंय.' समीरला अपेक्षा होती की प्रियांश त्याला आलेले scraps वा messages वाचेल, पण प्रियांशने search option मध्ये स्म्रीतिचं नाव टाकताच त्याची उत्सुकता वाढली.

'स्म्रीति?' समीरने प्रश्नार्थक नजरेने प्रियांशकडे पाहिलं.

'फक्त profile बघतोय रे.'

प्रियांशचं बोलणं ऐकून समीर हसतच त्याला म्हणतो, 'समजू शकतो तुझ्या भावना.'

'ऐश्वर्याचा फोटो, 42 friends. Scraps दिसत नाहीत privacy मुळे, असून असून असणार तरी किती.'

प्रियांशचं सगळं profile चाचपडून होतं.

'Facebook उघड.' समीर.

Facebook वर मात्र तिचं account च सापडलं नाही. तिने अजून account बनवलं नसेल हा त्या दोघांनी बराच वेळ शोधमोहीम करून काढलेला निष्कर्ष.

'तुला कच्चं खाऊ बघणाऱ्या मुलीसोबत राहणाऱ्या स्म्रीतिला असं Orkut वा Facebook वर stalk करून काही मिळणार नाही.' प्रियांश मात्र यावर काहीही बोलत नाही.

'तुला खरंच आवडायला लागलीय का ती?' समीर.

'नाही.' ते नाही ऐकून समीरचं समाधान व्हावं तरी कसं. तो प्रियांशकडे बघू लागतो.

'तिच्या शेजारी बसल्यापासून मात्र डोक्यात फक्त तिचेच विचार आहेत.' प्रियांश नाही म्हटला खरा पण सगळीकडे तिच असल्याची कबूली मात्र तो नाकारू शकला नाही.

'जर गेली 13-14 तास तू फक्त तिचाच विचार करतोय तर आपल्या भाषेत त्याला आवडायला लागणं असंच म्हणतात.' समीर.

'काहीही.' प्रियांश.

'त्या झोपलेल्या विभोरला आत्ता जरी उठून विचारलं ना तोसुद्धा हेच सांगेल.' समीर.

काही क्षण कुठलीही प्रतिक्रिया न देता प्रियांशने समीरला त्याच्या मनात चाललेल्या विचाराला मोकळं केलं.

'ती इतर मुलींपेक्षा वेगळी वाटते.'

'ती कशी बरं?' समीर उत्सुकतेने विचारतो.

'सहजा सहजी समजण्यापलीकडे. तासभर जवळ बसलो पण तिच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नाही. ओठांची हालचाल नाही. गालावर येऊ पाहणाऱ्या लटेला मागे सरसावताना कुठली आतुरता नाही. तितके डोळेच काय बोलत होते तिचे. त्यांत मात्र तिचे स्वप्नंच दिसत होते. ना कुठला राग, ना साधेपणाची भावना, ना वेंधळेपणा.' प्रियांश स्म्रीतिचं वर्णन करताना जणू तिच्याजवळ बसून घालवलेल्या प्रत्येक सेकंदाला अनुभवत होता.

'मी जेव्हा प्रेमात पडलो ना तेव्हा दुसरं वर्ष सुरू होतं आपलं‌. तुला आठवत असेल कसा तिचा अपघात झालेला आणि कसं तिला दवाखान्यात नेलेलं. चेहऱ्यावर छोट्या-मोठ्या जखमा. ओठ सुजलेले. डोळे सुजलेले. पण त्या काही दिवसांत तिची काळजी घेताघेता जाणवलं की हेच प्रेम.' समीर.

'हो! पण त्या अपघाताआधी सुद्धा कॅन्टीनच्या पायऱ्या सोबतच चढायचे तुम्ही.' प्रियांश.

'तेच तर. तुला स्म्रीति आवडते पण प्रेमात पडायचं कारण लगेच थोडे ना भेटणार.' समीर इतकं बोलून न थांबता पुढे म्हणतो,
'आणि प्रत्येकाला आयुष्यात कुणाची तरी गरज असतेच. तुलाही आहे. जे तिचं स्वप्न आहे ना, ते तुझी गरज आहे हे विसरू नकोस.'

'मला स्म्रीति आवडते हा तू काढलेला निष्कर्ष आहे, मी नाही.' प्रियांश.

'असं असेल तर म्हण तरी की तुला ती नाही आवडत.' समीर.

'आत्ता तू ना झोपून घे.' प्रियांश असं म्हणताच समीर हसतच खुर्चीतून उठतो.

'एकदा जन्काचं Facebook profile बघ. स्म्रीतिचा एखाद दुसरा फोटो सापडेल तर सांगता येत नाही.' समीर प्रियांशला चीडवतो.

'Status upload केलंय तिने तासाभरापुर्वी.' तिचं profile उघडताच प्रियांश चिंयाग्रस्त होतो.

'काय?' समीर जाणून घेण्याची उत्सुकता दाखवतो.

'Beware, we are watching you!' प्रियांश वाचतो.

'तुला tag केलंय का?' समीरला चीडवताना मजा वाटत असते.

'उद्याचं project session व्यवस्थित पार पडो. देवा, ऐकतोय ना?' प्रियांश मान वर करत मनोमनी प्रार्थना करतो.

'घंटा!' विभोर झोपेतच बडबडतो.

'आं?' प्रियांश आणि समीर दोघंही एकाच वेळेस विभोरकडे बघतात.

'घंटा वाजव. देव झोपलाय, त्याला लवकर उठावं लागतं पहाटे.' विभोरची बडबड ऐकून मात्र दोघांनाही हसू आवरत नाही.

समीर आणि विभोर झोपल्यानंतर प्रियांश मात्र पुन्हा Orkut वर संदीप खरेच्या community मध्ये काहीतरी लिहावं म्हणून complete this line... thread उघडतो. 'प्रेम म्हणजे...' या दिलेल्या ओळीवर अजयने लिहीलेली कविता वाचून तो स्म्रीति सोडून कुणाचा विचारही करू शकत नव्हता.

सांग मज आता प्रभू तू, प्रेम म्हणजे काय रे
स्वार्थी, निब्बर जग हे सारे, प्रेम ना उरले खरे रे

(देव ):
प्रेम म्हणजे राम ओला, प्रेम म्हणजे हाय अबोला.
प्रेम माझा श्वास आहे, प्रेम माझा देह आहे
शुध्द, सात्विकता जिथे, अन लाभले पावित्र्य आहे
आईच्या डोळ्यात दिसते, प्रेम ऐसे वंद्य आहे
सांज ढळताना परत त्या, पावलांची ओढ आहे
गंध प्रेमाचाच येतो, या फ़ुलांशी त्या फ़ुलांशी
स्वप्ने स्वप्ने जागताना, प्रेम रे रुजते मनाशी
प्रेम ज्याला कोश नाही, नाटकी अन टोप नाही
सौख्यनांदे चाळणीला, प्रेमरूपी छिद्र नाही
कोण म्हटले देवळाच्या पायथ्याला देव नाही !!

पालवी हळुवार फ़ुटते, प्रेम ते तारूण्य होते
पान पानातून भिजल्या, पावसाचा थेंब होते
पाखरांचे पंख होती, अन धुक्याचा रंग होती
एक क्षण वाटे कळाले, क्षण दुजा अज्ञात होती
ही नशा ऐसी गुलाबी, श्वास घेता स्पर्श फ़ुलती
भाव जो डोळ्यात येता, चंद्र तारे धुंद होती..
दरवळे मातीत ओल्या, सावली होते नभाची
अर्थ जे मौनास देते, प्रेम ऐसे गीत होती
जे मनापासून होते, प्रेम तेचि सत्य असते
सौख्यशांती वास्तवाला, ती खरी सुरुवात असते
प्रेम हे प्रेमात जेथे, त्या तेथे राहीन मीही
जीवना त्या गंध माझा, अर्घ्य अन अर्पिण मीही
शाप नाही देत तुम्हा, मागणे पण एक माझॆ
स्वार्थी निब्बर जीवनातून, दूर ठेवा 'प्रेम' माझे
शब्द हा उच्चारण्याही, जीभ मग ती थरथरुदे
राहीलो वंचित प्रेमा, शल्य हे तुम्हा सलूदे!!

मित्रा खूपच वेळ झाला, चल आता निघतोच मीही..
बघ तिथे विरहात माझ्या, राधा रे व्याकुळ झाली
मानतो आभार तुझिये, बरेच झाले, भेट झाली
काय सांगु तुज, नव्याने आज राधा मज उमगली !!!

.


दुसऱ्या दिवशी 4.30 वाजता प्रोजेक्ट लॅबमध्ये येताच त्या चौघी ज्या computer साठी मागच्या वेळेसची दोन तास वाया घातली होती तिथे प्रियांश आणि इतर तिघांना न बसलेलं बघून आनंदी होत होत्या.

मात्र, त्या चौघांना दुसऱ्या computer समोर बसलेलं बघून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदावर लगेचंच गोंधळाने जागा घेतली.

Project Lab म्हणजे Computer department ची सर्वांत advance lab. USB connectivity सोडून बाकी सगळ्या सुविधा enabled असलेली. एका computer समोर चार जणं सहज बसू शकतील इतकी प्रशस्थ.

कॉलेजच्या त्या project lab मधील AC मधून निघणाऱ्या हवेने जी दिवसभरातल्या थकव्याला घालवण्याने शरीराला जी स्थिरता मिळायची ती कदाचित ऑफिसमधल्या AC तल्या सुगंधित हवेने सुद्धा मिळत नसणार हे प्रियांशचं ठाम मत होतं.

पण त्यादिवशी project lab च्या हवेत वेगळे रंग दिसत होते. AC च्या हवेचा इतकासाही फरक पडत नव्हता.

प्रियांश चिंताग्रस्त होता. कितीही नाही म्हटलं तरी CPU ची जागा बदलण्याची कल्पना त्याचीच होती.

'प्रियांश, त्या रट्टा मारणाऱ्या मुलींना काही कळणार नाही. तू उगाच भीतोय.' मानसने त्याला त्या चौघींकडे न बघण्यासाठी सांगितलं.

कितीही नाही म्हटलं तरी मनात भीती असणारच होती. जन्का आणि स्म्रीति काही फक्त रट्टा मारून टॉप करणाऱ्या नव्हत्या.

15 मिनिटे झाली असणार. चौघं त्यांच्या presentation ची तयारी करत होते. मानस सांगत होता की presentation वेळी कोण कुठल्या slides कशापद्धतीने सर्व professors समोर मांडेल.

जिथे इतरांचा project topic ठरत नव्हता तिथे ते चौघं ठरलेल्या topic वर presentation देणार होते पुढच्या project session वेळी.

'आपण या slide वर gif file ने signal...' मानस पुढे आणखी काही बोलणार तितक्यात असं काही घडलं जे अपेक्षित असूनही अविश्वसनीय होतं.

'प्रियांश!' जन्काच्या आरोळीने संपूर्ण computer department नक्कीच स्तब्ध झाला असणार क्षणभरासाठी. Project lab मध्ये त्यावेळी असणारे इतर 7 groups अगदी शांततेत जन्काकडे आणि प्रियांशकडे बघत होते. वादळापूर्वीची स्तब्धता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

ते चौघं बसलेल्या जागेकडे ती पाऊलं टाकू लागली. प्रियांश अवाक् होऊन तिच्यासमोर उभा राहतो.

इतर तिघी तिच्यामागे येऊन उभ्या राहिल्या. त्याचं क्षणभरासाठी स्म्रीतिकडे लक्ष जातं. जन्काच्या स्वभावाला जाणून असणाऱ्या तिच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की आज जन्का खाऊन टाकणार होती त्याला.

'तुझी हिंमत कशी झाली CPU बदलायची?' तिच्या आवाजातील कणखरपणा इतकाही कमी झाला नव्हता.

'मी काय म्हणतो...' प्रियांश.

'एक शब्दही न बोलता तो CPU आधीच्या जागेवर लाव.'

'पण, ऐक तरी...'

'लगेच!'

तो काही बोलणार त्या आधीच स्म्रीतिचे काळेभोर डोळे त्याला शांत राहण्यास सांगत होते. त्या डोळ्यांत त्याच्यासाठी अनपेक्षित काळजी दिसत होती. त्याने काही बोलावं असं तिला वाटत नव्हतं.

'हे बघ जन्का, आमचं project चं काम सुरू झालंय. तुम्ही download केलेले documents mail करतो ना मी.' मानस तिला समजावण्याचा प्रयत्न करतो.

'प्रियांश!' तिचा राग पार उराशी येऊन पोहोचला होता. इतका तिरस्कार का होता तिचा प्रियांशवर?

'काय चाललंय?' HOD सर कधी आत आले याचं कुणालाही इतकंसुद्धा भान नव्हतं. त्यांच्या येण्याने मात्र जन्का शांततेत काही ऐकेल असं नव्हतं.

'सर, यांनी कुणाचीही परवानगी न घेता CPU ची जागा बदलली.' जन्का.

'सर, आमचं काम आधीच सुरू झालंय आणि या चौघी तिथून उठायला तयार नव्हत्या म्हणून आम्हाला असं करावं लागलं.' मानस.

'पण सर...' जन्का आणखी काही बोलणार त्याआधीच सरांनी तिला थांबवलं.

प्रियांश काहीतरी बोलेल याची ते वाट बघत होते.

'प्रियांश, कुणाला विचारून तुम्ही CPU ची जागा बदलली?'
सरांनी विचारलं. त्याला मात्र काही बोलवेना. शेवटी कितीही नाही म्हटलं तरी संपूर्ण चूक त्याचीच होती आणि जेव्हा आपल्याला आपली चूक जाणवते ना तेव्हा आदरणीय व्यक्तीकडे बघण्याची हिंमतसुद्धा होत नाही.

'ही project labआहे, इथे साधं mouse सुद्धा बदलवण्याआधी परवानगी घ्यावी लागते. तुम्ही मात्र CPU च उचलून दुसरीकडे नेलाय.' ते इतके बोलून थांबले. त्या चौघं project partners वर नजर फिरवली.

'एकदा तरी मला येऊन सांगायचं होतं काय problem येतोय तुम्हाला ते.' चौघांकडे बघत ते बोलत होते. दोन क्षण विचार करून त्यांनी त्यांचा निर्णय ऐकवला,
'तुम्ही चौघांनी महीनाभर project lab मध्ये पाय ठेवायचा नाही.' सरांचं ऐकून जन्का मात्र विजयी मुद्रेने प्रियांशकडे बघत होती. स्म्रीति संभ्रमात दिसत होती. प्रियांश मात्र अजूनही स्तब्ध होतो. मानस सरांना मनवत होता पण त्यांनी मात्र काहीही न ऐकता चौघांना बाहेर जायला सांगितलं.

Lab च्या बाहेर आलेत खरं पण project वर किती परीणाम होणार हा विचारसुद्धा त्या चौघांना खायला करत होता.

Project lab च्या बाहेर भिंतीला लागून असणाऱ्या 2 फूट उंच असलेल्या shoe rack वर बसून प्रियांश स्तब्ध होऊन बसतो‌.

Computer department अगदीच शांत होता त्यावेळी. Project lab, departmental library आणि HOD सरांचं cabin सोडलं तर इतर labs, staff cabins सगळीकडे शांतता पसरली होती.

प्रियांशचे तिघं partners मात्र HOD cabin बाहेर उभं राहून त्यांची वाट बघत होते‌. त्याला ती शांतता कधीही सहन व्हायची नाही पण त्याक्षणी तो स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीमुळे अगदी अंतर्मुख होऊन बसलेला. HOD केव्हा project lab मधून बाहेर आले हेदेखील त्याला कळलं नाही.

'प्रियांश!' काही वेळाने स्म्रीति lab मधून बाहेर आली.

'ओह, हाय स्म्रीति!' प्रियांशला त्याक्षणी काय बोलावं काही सुचेना.

'तुमची काही चूक नाहीये. आम्ही बोलतो उद्या HOD सरांना.' स्म्रीति.

'तुम्ही? म्हणजे जन्कासुद्वा?' प्रियांशने असं विचारताच ती होकारार्थी मान हलवते.

'राहू देत.' त्याला त्या परीस्थितसुद्धा हसायला येतं.

'तुझ्यासाठी distinction मिळवण्यासाठी project खूप महत्त्वाचा आहे असं तू म्हटलेला. मला नाही माहिती तुमच्यात कसली खुन्नस आहे पण इथे विषय marks चा आहे.' स्म्रीतिचं बोलणं ऐकून त्याला गेल्या 2 दिवसांत तिच्याबद्दलची ओढ खरी आहे हे जाणवतं.

'तू इतकं येऊन बोलली हेच पुरेसं आहे माझ्यासाठी. Thank you!'

ती पुन्हा project lab मध्ये जाते आणि त्याचे project partners तेव्हा HOD सरांच्या cabin बाहेर उदास चेहऱ्यांनी बाहेर येताना दिसतात.

वर्ष चुकीच्या पद्धतीने का होईना पण गाजवायला सुरुवात झाली होती. ते बरोबर करण्याचं काम मात्र स्म्रीतिच्या हातात होतं.

जे मनापासून होते, प्रेम तेचि सत्य असते
सौख्यशांती वास्तवाला, ती खरी सुरुवात असते


कालच्या त्या कवितेतील ओळी अजूनही त्याच्या मनी होत्याच.


Link: भाग आठवा

No comments:

Post a Comment