भाग चौदावा: आजचा दिवस
नातं कधीच नाही संपलं..
झालं गेलं सरलं सारं,
संपला तो सहवास, राहिले फक्त अवशेष..
आता काय करणार?
फक्त नातंच उरलंय शेष..
कधी केव्हा कुठे कसा
समजलाच नाही, संपला आपला प्रवास,
राहीलाय तो फक्त,
एक शेवटचा निःश्वास..
कळलंच नाही कधी,
पण खुप जीव लागला होता
तू तर निघून गेलीस,
नात्याचाच तेवढा धागा उरला होता..
वाळवंटातल्या मृगजळागत
होता का सारा आभास?
निसटून गेली हातून प्रेमाची रेती,
उरला आहे तो या नात्यावर विश्वास..
क्षणभराचं प्रेम आपलं
नातं कधीच नाही संपलं..
मोबाईल फोन वाजू लागताच मी भानावर आलो. लॅपटॉपच्या screen वर उघड्या असलेल्या, लिहून पूर्ण झालेल्या कवितेच्या word document ला सेव्ह करून लॅपटॉपला बाजूला ठेवलं.
समीरचाच फोन असणार हे ठाऊक होतं. गेल्या 5 वर्षांत कॉलेजला लागलेल्या सवयीप्रमाणे आम्ही दोघं मावळलेल्या दिवसाबद्दल न चुकता बोलायचो.
अर्थात, शहरं बदलली होती. भेटी इतक्या नाही व्हायच्या. पण टिकते ती मैत्री, निभावता आली की!
समीर नसता तर कदाचित अजूनही सावरलो नसतो. शेवटी, प्रेमाच्या नात्यातल्या तुटक्या धाग्या दोऱ्यांना मैत्रीचाच आधार असतो.
'कसा झाला इंटरव्यू?' फोन उचलताच त्याचा पहिला प्रश्न.
'आपला इंटरव्यू कधी खराब जातो का?' फार इंटरव्यूज नाही द्यावे लागलेत खरंतर चांगल्या नोकरीसाठी. त्यात, पहिल्यावहिल्या इंटरव्यूमध्येच पहिलीवहिली नोकरी भेटलेली. माझ्या त्या न सावरलेल्या हृदयावर तेव्हा मी जिंकलेलं एकमेव युद्ध.
'ते आहे मात्र.' माझ्या परदेशात जाऊन स्थिरावण्याच्या कल्पनेला त्याने आधीच नाही म्हटलं होतं त्यामुळे जॉईन होत नाही तोपर्यंत सांगायचंच नाही, असं वाटत होतं. तसं एकमेकांची मनं वाचणाऱ्या आमच्यात हे किती दिवसं लपून राहणं शक्य होतं, देवंच जाणे.
'जन्का भेटली होती.'
शेवटच्या वर्षाच्या सुरुवातीपासून तर शेवटच्या वर्षाचा शेवटचा दिवस संपेपर्यंत जन्काचं नाव निघालं नसेल असा एकही दिवस गेला नव्हता. त्यामुळे तो तिला विसरला असेल हे अशक्यंच.
'जन्का, द झुनका भाकर?' काळामागे नेणारं नाव ऐकून त्याने विचारलं.
'हो. ती तिथे काम करते.'
'आत्ता म्हणू नकोस तू जॉईन होतोय तिथे!'
'भेटलेली ऑफर नाकारण्यासारखी नाहीये.'
'पैशाला महत्त्व न देणारे आपण अशा ऑफरला नाकारू शकतो, ज्या ऑफरला हो म्हणून रोज आपण अशा चेहऱ्याला बघू जो आपल्याला भूतकाळाकडे नेईल. ज्या भूतकाळाने आपल्या वर्तमानाला अजूनही सावरू दिलेलं नाहीये.'
'कधीकधी भूतकाळातील व्यक्ती वर्तमानात वेगळ्या रूपात येऊ शकते.' तिचं आत्ता चांगलं वागल्याने तसा राहून राहून फारसा फरक पडणार नव्हता.
'आणि कॉलेजला असणारा बालिशपणा तिच्या डोळ्यांत इतकाही दिसत नव्हता, तिच्या चुकीच्या वागण्याची जाणीव मात्र त्यांत जाणवत होती.' मी मात्र तिचा बचाव करण्यात इतकाही मागं राहत नव्हतो.
'तुझ्या डोळ्यांच्या भाषेवर विश्वास नसता तर आधीच्या दोन ऑफर्स असलेल्या कुठल्यातरी ठिकाणी जॉईन व्हायला सांगितलं असतं.' समीर.
'काहीच होणार नाही रे, तू नको काळजी करू.'
'हां! महीनाभर suspend होता project lab मधून तू आणि तुझा project group त्या मुलीमुळे. हे आठवल्यावर वाटणारच ना काळजी.'
डोळ्यांसमोर एखाद्या movie सारखा शेवटच्या वर्षातला तो दिवस दिसू लागला.
'प्रियांश! प्रियांश! हॅलो.' समीरने माझ्या भूतकाळात हरवून गेलेल्या मनाला भानावर आणलं.
'मी join होतोय. बघुयात काय काय होतं पुढे.' मी असं म्हणताच तो हसला.
'ठीक आहे. हो join, फक्त फालतूचं suspension टाळ यावेळी.' आम्ही दोघंही हसलो.
थोडं आणखी एकमेकांच्या दिवसभरातलं जाणून घेतलं.
'आणि लिहीलेली कविता पाठव.' समीरने फोन ठेवण्याआधी मी आज काहीतरी लिहीलंच असणार हे गृहीत धरत कविता वाचायला मागितली.
.
संध्याकाळचे सात वाजलेले. शनिवारचा दिवस मावळतीकडे झुकू लागला. आकाशात भरून आलेल्या ढगांनी लवकरच पाऊस सुरू होण्याची जाहीर गर्जना केली.
पावसाचं वातावरण असल्याने मी बाईकने जाण्याचं टाळत कॅब बूक केली.
जन्काचा वाढदिवस साजरा करायच्या हेतूने निघालो होतो कुठलंही gift न घेऊन जाता. त्यामुळे, रस्त्यात लागणाऱ्या pastry corner वरून केक घ्यायचं मी ठरवलेलं.
जन्काचा वाढदिवस हे कारण मात्र खूप साऱ्या आठवणींना जागं करून सतावतंय. प्रत्येक आठवणीनंतर डोळ्यांसमोर उभा राहतोय एक 'का?' आणि तो प्रत्येक 'का' मात्र माझ्या निरूत्तर चेहऱ्याकडे बघून हसतोय, मला डिचवण्यासाठी.
आठवणींसारखी दुर्मिळ गोष्ट नाही. जितकी नकोशी, तितकीच हवीहवीशी. जितकी दिलासादायक, तितकीच हळवी.
त्यात, ती तुझी असेल तर विचारायलाच नको. मग वाटतं, आठवणींचा सहवासही वाईट नाही. सावरता आलं नसलं तरी जगणं अशक्य नाही.
कारच्या खिडकीतून दिसणारा बाहेर सुरू असलेला पाऊसही त्या आठवणींना डोळ्यांसमोर आणून त्याची भुमिका निभावण्यात कुठलीच कसर सोडणार नाही, हे जाणवताच मी डोळे मिटून घेतले.
पाऊस असला की
भिजत राहतात त्या आठवणी..
तो, मी आणि
दूर कुठेतरी तू..
जागत राहतात मग रात्रीही...
.
'प्रियांश!' कॅबमधून उतरल्या उतरल्या समोर बघतो तर पावसापासून स्वतःला वाचवत आडोशाला उभं राहून वाट बघत उभी असलेली, 5 फूट 1 इंच इतक्या उंचीची काळा टॉप आणि निळी जीन्स परिधान केलेली गोरीपान बाहुली, रस्त्यावर दिसणाऱ्या कुणाचीही तमा न बाळगता आनंदाने किंचाळली जणू.
मला बघून झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर भरभरून दिसला. तिच्यासमोर येऊन उभं राहताच तिने तिच्या मानेपर्यंत येणाऱ्या केसांना उडवत मला मिठी मारली. अजूनही ती तीच नेहमीची अक्षरा. ना दिसण्यात बदल ना वागण्यात!
'अक्षरा, तुला इथं इतक्या दिवसांनंतर बघून खूप बरं वाटलं!'
'इतक्या वर्षांनंतर असं म्हणायचंय का तुला?' तिचं असं म्हणणं चेहऱ्यावर मिश्किलसं हसू घेऊन आलं.
स्म्रीतिची रूममेट म्हणून तिने गरज असताना खूपदा मदत केली, कधीकधी न मागता सुद्धा.
'तू बंगलोर वरून फक्त जन्काच्या वाढदिवसासाठी आलीये?'
अक्षरा बंगलोरला असते हे जन्काकडूनच कळलं होतं.
'हां, असंच समज.' ती चेहऱ्यावर प्रफुल्लित हास्य आणत म्हटली, फक्त वाढदिवस हे कारण नव्हतंच तर.
'जन्का अजून आली नाहीये. आपण दोघं तिच्याआधी पोहोचलोय, अशी कशी होस्ट!' अक्षरा.
'पावसामुळे अडकली असणार ट्रॅफिकमध्ये.'
'तिच्या लक्षात राहील हा वाढदिवस असं काहीतरी करावंसं वाटतंय. नुसतं जेवन वगैरे काय ते पुन्हा कधी होईलंच सोबत.' अक्षराचं म्हणणं पटण्यासारखं होतं पण कॉलेज संपल्यानंतर लक्षात राहील असा कुणाचा वाढदिवस साजरा केलाच नव्हता. वेगळं काय करावं याचा विचार करता करता तिला हो म्हटलो.
'तू काय देतेय गिफ्ट म्हणून?' मी.
तिने जन्कासाठी आणलेलं गिफ्ट बघताच तिचं कौतुक करावंसं वाटलं. कॉलेजला असताना मी, समीर आणि विभोर जसे होतो तसलं वेडेपण अक्षरात अजूनही टिकून होतं.
'चला तर, आठवणींना उजाळा देऊयात.' लक्षात राहील असं वेगळं काय करावं हे ते गिफ्ट बघताच मला सुचलं.
तितक्यात, जन्का कॅबमधून उतरत आमच्या दोघांसमोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर खूप सारी प्रसन्नता, जी तिला खऱ्या अर्थाने सुंदर बनवत असते. तिने घातलेल्या त्या तिला देखणं बनवणाऱ्या मोरपंखी रंगाच्या ड्रेसकडे माझं लक्षसुद्धा गेलं नाही, इतका तिचा चेहरा प्रसन्न वाटला.
'Sorry, ट्रॅफिक असल्यामुळे थोडा उशिर झाला.'
'आज तुला सगळे गुन्हे माफ!' मी तिच्याकडे बघत हसतच म्हटलो.
कॉलेजमधील जन्का, ऑफिसच्या पॅन्ट्रीमधील जन्का आणि समोर उभी असलेली जन्का या तिघी एकच, हा विचारही माझ्या मनाला पटेना.
'तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्का.'
माझ्या हातातील केक बघून तिला खरंच बरं वाटल्याचं तिच्या चेहऱ्यावर दिसलं. आयुष्यातील या खास दिवसात असल्या छोट्या-मोठ्या गोष्टी आभाळभर आनंद देऊन जातात, हे फार चांगलं जाणून होतो मी.
'Thank you so much!'
मी तिच्या डोळयातून ठिपकाभर काजळ काढत तिच्या मानेखाली लावणार पण तिने तितक्याच काळजीने तिच्या नाजुकशा हाताने माझी मनगट धरली.
'मला... या जन्केला कुणाची बरं नजर लागणार?' माझ्या डोळ्यांत बघत तिची उदासीनता तिने दाखवली.
'तुला लागो ना लागो पण ते चौघं तिळं आहेत की नजर लागण्यासारखे.' मी हसतच तिच्या मानेला बोटावर असलेलं काजळ लावलं. ती काहीच न उत्तरता स्तब्ध राहिली.
'Happy birthday, जन्के.' अक्षरा जन्काला घट्ट मिठी मारत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यांचं मी कशी दिसतेय, ड्रेस कुठून घेतला वगैरे g-talk सुरू झालं.
जन्काला आवडेल अशा ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा हा हेतू मनात ठेवत मी तिच्या नकळत वेळ न घालवता कॅब बूक केली.
'गिफ्ट कुठंय माझं?' जन्का.
'आणलंय, रडू नको नेहमीसारखं.'
'हां, रडावंच लागेल कारण पुढच्या वर्षी आमच्या गिफ्ट्सचा खर्च सुद्धा जीजूंवरच होणार.'
'बोर करू नकोस.' अक्षरा हे वाक्य हसतंच म्हणाली.
'तू लग्न करतीये?' प्रश्न चुकला की काय असं जाणवताच पुन्हा नव्याने मी विचारलं, 'लग्न ठरलंय?'
'हो. इसका बड्डे तो बहाणा हैं!' अक्षरा मात्र जन्काकडे बघून डोळे मिचकावत बॅग मधून तिच्या लग्नाची पत्रिका माझ्या हातात ठेवते.
'पत्रिका वाटायच्या होत्या काही आणि तू भेटतोय म्हटल्यावर मला रहावलं नाही.'
'Destination wedding?' 4 दिवसांचं लग्न ते सुद्धा केरळच्या निसर्गरम्य सान्निध्यात.
'माझ्या होणाऱ्या नवऱ्याची इच्छा. म्हटलं त्याला, त्याची इच्छा मग खर्चही त्यानेच करावा.'
'Love plus arrange?'
'नाही! फक्त arrange. प्रेम काय फुलणारच हळूहळू, सगळं सांभाळत. Arrange असलं तरी इतका खर्च होणं शक्य नाही माझ्या बाजूने, म्हणून जो होईल तो अर्धा अर्धा.'
'तुला सांभाळता येईलच गं. जबाबदाऱ्या सांभाळणं शिकतेय मी अजूनही तुझ्याकडून.' जन्का असं म्हणताच मला आठवलं की स्म्रीति नेहमीच म्हणायची, 'अक्षराचे बाबा ती लहान असतानाच वारलेले पण तरीही ती सगळ्यांसमोर आनंदी, हसतमुख राहते. तिला जमतं जे कुणालाच नाही जमत. रोज नवीन काहीतरी शिकवत असते तिच्या वागण्यातून, आम्ही किती शिकतो हा भाग वेगळा.'
'नशिबवान आहे तुझा होणारा नवरा.' 2 महिन्यांनी असणाऱ्या तिच्या लग्नाला येण्याचं आश्र्वासन वदवून घेतलं तिने, नवीन जॉईनिंग वगैरे कुठलंही कारण चालणार नव्हतं.
'तुझा काय प्लॅन लग्नाचा? की आयुष्यभर वाट बघणार स्म्रीतिची?' अक्षराच्या या प्रश्नाला उत्तर द्यावं तरी काय!
'खरं सांगू, पळतोय या प्रश्नांपासून. कॉलेज संपलं आणि आयुष्य थांबलंच. मोनोटोनिक जगणं सुरू आहे थोडक्यात. नोकरी बदलण्याचा विचार तरी आला, तोही परदेशात स्थायिक व्हावं या विचाराने. त्यात तिथे ही भेटली, आज तू, आणि आत्ता इथे रिमझिम पावसात उभं राहून वाटतंय की बदल होणं किती गरजेचं असतं.'
'अर्थात, पण मग या पळवाटा तुझ्या मनाला थोडी पळवणार. एक वेळ येईल की एकटं आयुष्य नकोसं वाटेल मग काय करशील?'
'एकचदा प्रेम होतं जीवनात, याच विचारांत वाढवलंय स्वतःला. प्रेम, लग्न यांचा विचार आत्ता तरी नकोच.'
'स्म्रीति परत आली आयुष्यात तर?'
'हा प्रश्न हसण्यावारी घेऊ की मनाला पटवू ती खरंच येईल?'
'तू अजूनही वाट बघत बसलाय तिची म्हणून पटवून घे. नाहीतर हसण्यावारी घे आणि खूप काही शिकवून गेलं तिचं आयुष्यात नसणं असं समजून विसरून जा तिला.'
अक्षरा इतक्या सहज बोलत होती सगळं काही. ती जाणीव करून देत होती की थांबावं तरी का आणि कशासाठी, स्म्रीति कुठे आहे हे माहिती नसताना रडत बसावं तरी कशाला.
'सगळ्यांचंच कॉलेजमधील प्रेम टिकतं असं नसतं. वेळेनुसार गणितं बदलतात, कधी खऱ्या-खोट्याचा फरक कळतो तर कधी घरच्यांचा विरोध नडतो. थांबून राहण्यात अर्थ नसतो, हे कळायला वेळ लागतोच.' मला 5 वर्षं झालीत आणि मला अजून कळलं नाहीये. अक्षराचं बोलणं कितपत समजवणार होतं, माहिती नाही.
'प्रज्ञा मात्र अपवाद ठरली.' जन्का.
'कुठे असते ती सध्या?' मी उत्सुकता दाखवली. खरंतर प्रज्ञा आणि माझ्यात फार काही बोलणं नव्हतंच कॉलेजवेळी. त्यात ती नेहमीच जन्काच्या बाजूने असायची, म्हणून तर विषयच नसायचा.
'युरोप फिरत असते नवऱ्यासोबत.' जन्का.
'कसला नशिबवान म्हणावा प्रज्ञाचा boyfriend. कॉलेजच्या वेळी तिला नुसतं बघूनच मुलांच्या जीभेतून लाळ टपकायची. त्यांत, इतक्या साऱ्यांमध्ये त्या चोमूने तिला पटवणं म्हणजे आठवं आश्र्चर्यच.' अक्षरा हसतच म्हटली.
'कुणाला तरी प्रेम टिकवता आलं म्हणायला गेलं तर. तो चोमू असून त्यांचं प्रेम त्यांनी टिकवलं आणि लग्नही केलं आलेल्या अडथळ्यांना पार करत. नाहीतर स्म्रीति मात्र प्रियांशला सोडून गेली, तेही इतक्याशा कारणाने.' जन्का.
'तिच्यासाठी ते कारण इतकंसं नव्हतंच.' मला मात्र आजही त्या दिवसाला आठवून गहिवरून येतं.
पुढचे काही क्षणं अबोल होऊन बसले तिघांसाठी. सुदैवाने, कॅब नेमकी तेव्हाच आमच्या लोकेशनवर येऊन पोहोचली.
'कॅब का बोलवली? आपण या ठिकाणीच जेवणार होतो ना!' जन्का निरागस चेहरा करत विचारते.
'तू बस आत.' मी.
'पण...' गोंधळलेली जन्का.
'ए जन्के, बस की. किती चौकशी करणार आत्ता!' अक्षराने तिला आत ओढलं. त्या दोघी मागे बसल्या आणि मी ड्रायवरशेजारी, पुढे.
'प्रियांश, प्लॅन बनला ना?' अक्षराने असं विचारताच मी हसतंच हो म्हटलो.
'मग ठिके. आपण birthday girl च्या मनातलं जाणूया थोडंसं, destination येईपर्यंत.'
'तुला कॉलेजला असताना सगळ्यात जास्त काय करायला आवडायचं?' अक्षरा.
'अभ्यास करायला.' जन्का हसतच उत्तरली.
'अर्थात, आणि त्यानंतर?' मी विचारलं खरं, पण जाणवलं की जुन्या आठवणी जाग्या होणार!
'तुझ्यावर चिडणं.' ती पुन्हा हसतच म्हटली.
'आणि तू त्याच्यावर कधीपासून चिडायला लागली होती?' अक्षराने असं विचारता मी मात्र कोड्यात पडलो.
'म्हणजे?' मी विचारलं.
पुन्हा काहीतरी नवीन ऐकायला भेटणार होतं, अक्षराचं आजचं भेटणं म्हणजे धुळ बसू लागलेल्या जुन्या आठवणींना साफ करणंच जणू.
'एक खरं सांगू प्रियांश तुला? कॉलेजमध्ये तू सगळ्यात आधी कुठल्या मुलीला आवडायला लागला होता तर तो या जन्केला.'
'काहीही!' जन्का.
'मला पाण्यात बघणाऱ्या मुलीला मी आवडणं अशक्यच!'
'ही तुला पाण्यात बघायला लागली ते दुसऱ्या वर्षाच्या गॅदरींगनंतर.'
'असं त्या गॅदरींगवेळी मी काय वाईट केलेलं हिचं?' मला मात्र खूप मोठ्ठं कोडं पडलं. त्यावर्षी घडलेलं सगळंच आठवायला लागलो.
'तुला ती hottie आठवतेय का माझ्या branch ची?'
'सर्वशरीरसंपन्न! तिचा काय संबंध आत्ता?' गुंता सुटता सुटेना त्यात आणखीन नवीन भर.
'तिने तुला विचारलेलं ना boyfriend होण्याबद्दल!' जन्का असं म्हणताच मला आठवली ती रात्र, departmental day!
'पण तुला कसं माहिती?' अक्षराने भुवया उंचावून विचारताच जन्काच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले.
'मी होते त्यावेळी तिथेच. तिने माझा उल्लेख केला आणि हा जोरजोरात हसायला लागला. याचं हसणं ऐकून मग मी रडत चिडत निघून गेले हॉस्टेलला परत.'
'नंतर हा काय बोलला असेल बरं हे ऐकावंसं कधीच नाही वाटलं का तुला?'
जन्का अक्षराच्या असं विचारण्यावर काहीच नाही बोलली. मी तिला दुखावलं होतं माझ्याही नकळत. तिचं वागणं चुकीचं नव्हतंच तर आणि ना माझं.
'प्रियांश, तू सांगतोस की मी सांगू?'
'तुच सांग.' मला कुठून सुरुवात करावी हेच कळेनासं झालं.
'नको, तुच सांग. तुझे तेव्हाचे जसेच्या तसे शब्द ऐकायला मलाही मिळावेत.'
'खरंतर, मी तिच्यावर हसलो होतो आणि तुझ्यावर तर मुळीच नाही. मी बोलता-बोलता थांबलो होतो त्या मुलीसमोर पण तिला सांगावं तर लागणारच होतं. 'तुझ्या प्रेमात पडावं? इथं, इतक्या अंधारात तू ज्यापद्धतीने माझा हात पकडून मला सांगतीये की तुझं माझ्यावर प्रेम आहे त्यातून तुला नेमकं कसं प्रेम हवंय हे समजतं. मी प्रेमापासून दूर राहण्याचं कारणच तू समोर मांडून ठेवलंय. मला याक्षणी कुठलंही ओझं नकोय, मागण्या पूर्ण करवून घेणारी नकोय, सोबत मिरवणं जमणार नाही. मला हवीय एक मैत्रिण, जिला मी मनातलं सांगू शकेल, जिच्या माझ्याकडून कुठल्या भावनिक अन् शारीरिक अपेक्षा नसतील, जिच्यामुळे इतर मुली मात्र माझ्यापासून दूर राहतील, जिच्या स्वभावात एक कणखरपणा असेल. त्यात, मैत्रीपेक्षा न्यारं आणि प्रेमाच्याही पलीकडं नेणारं नातं असेल तर जगण्यालाही अर्थ येतो. जन्का तुझ्याजागी इथे असती तर आमची मैत्रीतरी झालीच असती.' जन्का, मला वाटलं होतं की आपली मैत्री होईल, पण तुझ्यासारखी मैत्रिण भेटणं मात्र नशिबी नव्हतंच.' जन्का ऐकत असताना तिच्या भावना किती दुखावल्या असणार, किती समाधानी झाल्या असणार हे जाणवून घेण्यात आत्ता अर्थ आहे का?
'आणि मी मात्र, त्या दिवसानंतर तुझ्याविषयी तू वाईट असल्याची भावना मनात अगदी खोलवर कोरून घेतली. या तिघींनासुद्धा तसंच भरवत राहिली. मी खूप चुकलेय.'
'कॉलेजचे ते दिवसं, तिथं केलेल्या चुका बोचत राहिल्यात आयुष्यात पुढे तर कसं व्हायचं?' मी जन्काला दोष दिला नाही कधी, तिच्या वागण्याचं तेवढं कोडं होतं.
.
आम्ही destination वर पोहोचलो.
'Oh my god.' Restaurant बघून याव्यतिरिक्त जन्काची कुठलीही reaction अपेक्षित नव्हती.
'Could you be some more dramatic?' माझ्यातला Chandler Bing जागा झालाच.
'OH. MY. GOD.' ती अगदी Janice च्या टोन मध्ये म्हटली आणि आम्हा तिघांनाही हसू आवरलं नाही.
CENTRAL PERK लिहीलेल्या दरवाजाला आत ढकलत F.R.I.E.N.D.S. Cafe च्या आत आलो.
तिथलं वातावरण, तिथली सजावट सगळं अगदी कसं प्रत्येक सीझनला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक सेकंदाला जिवंत करून देत होतं.
समोर होता त्या Central perk मधील तसाच couch आणि त्यामागे त्या सहा पात्रांचे potraits.
उजव्या बाजूला गेलं की Monica चं apartment सजवलेलं, अगदी जसंच्या तसं!
डाव्या बाजूला शब्दकोडं भरावेत तसं सहाही पात्रांची नावं असलेलं potrait.
जिन्याच्या भिंतीवर Pivot. Pivot. Pivot. असं ओरडत ओरडत सोफा ओढणाऱ्या Ross चं मोठ्ठं potrait.
हे सगळं बघण्यात हरवून गेलेली, F.R.I.E.N.D.S चं भयंकर वेडं असणारी जन्का मला बिलगलीच.
'Thank you so much, इथं आणल्याबद्दल!' ती इतकं भावूक होईल असं वाटलं नव्हतं.
'Hey, it's Joey. Couldn't I be more caring?' मी असं म्हणताच आम्ही तिघंही हसलो.
वरच्या मजल्यावर एका टेबलमागे Joey doesn't share his food असं डोळे मोठे करत म्हणणाऱ्या Joey चं potrait लावलेलं आणि ते बघून जन्काने तिथेच बसायचं ठरवलं.
'कुणा Gunther ला आवाज देऊन आपली ऑर्डर द्यावी का आत्ता आपण?' अक्षरा.
मेनू कार्ड बघायला सुरुवात केली आणि प्रत्येक पदार्थामागे Joey आणि Monica यांची नावं होती.
'Joey's favourite Pizza with cheese burst!' हे वाचताच मात्र मला हसायला आलं.
'Monica's eventually...' अक्षराला तिचं पूर्ण वाचून होण्याआधीच जन्का थांबवते.
'जिथं आलोय, तिथं असंच असणार ना! We better stick to the routine; we don't want to look stupid.' जन्का.
'And here comes our Monica with the Pep talk.' अक्षरा हसतच म्हटली.
पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच मागवले तिघांसाठी, पोट भरेल इतके. केक कट केला आणि आमचा happy birthday म्हणण्याचा आवाज पूर्ण कॅफेत घुमला.
'Why God why? We had a deal. Let the others grow, not me.' अक्षरा मात्र Joey ची reactions देत म्हटली.
'Jeez! 27 चीच तर झालीस तू, अजून grandma नाही झालीस. You are not over the hill yet!' अक्षरा.
'Everyone around me is getting married or getting pregnant and here I am just cutting the cake.' जन्का .
'ओलेले, होशील तू पण लवकरच आई.' हे मात्र अक्षरा हसतच म्हटली आणि जन्काने तिच्याकडे रागाने बघत नाक उडवलं.
'हे घे तुझं गिफ्ट, रागूबाई.' Pivot असं लिहीलं असलेला तो जुना टॉप अक्षराने जन्काच्या हातात ठेवला.
'ठिगळ लावलेल्या कापडामागे एकतर गरिबी दिसते किंवा जपलेल्या खूप साऱ्या आठवणी.' जन्काने अक्षराला घट्ट मिठी मारली आणि स्वतःच्या हाताने फाडलेल्या त्या टॉपकडे बघत असं म्हटली. डोळ्यांतून वाहणारे अश्रू लपता लपवत नव्हते.
'आठवणी जपून ठेवायच्या असतात मात्र त्यांची श्रीमंती ही मिरवायची असते.' असं म्हणत तसाच pivot लिहीलेला नवा टॉप अक्षराने जन्काच्या हातात ठेवला.
'चला, या टॉपमुळे तरी आत्ता तुझ्या आयुष्यात client सोडून कुणीतरी येईल.' मी असं म्हणत भावूक झालेल्या त्या वातावरणाला हसवत मोकळं केलं.
'प्रियांश, याठिकाणी आणून खरंच माझा वाढदिवस खूप खास बनवलास तू.' जन्का.
'Could I get more credit for this?' यावेळी अक्षराने Chandler बनण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पुन्हा हसलो.
'वाढदिवस खास बनवणं याला जमतंच, आणि हे मी शेवटच्या वर्षात असताना जवळून अनुभवलंय. कसला वेडेपणा होता याच्यात!' अक्षरा हसतच आठवण करून देत होती मी स्म्रीतिला तिच्या वाढदिवशीच केलेल्या प्रपोजलची.
तुझ्या जाण्याने उरलेला
हा मैत्रीचा धागा, तुझ्यामुळेच
तुलाही बांधून ठेवतोय
तुझ्याही नकळत, तुझ्यासाठीच
'आजचा दिवस मात्र त्यादिवसापेक्षा खूप वेगळाच कारण आत्ता असं काही करण्याचं सुचत नाही. जन्काला आनंद देऊ शकलो आज हेच पुरेसं.'
कॉफी प्यावीशी वाटली आणि मेनूतली नावं वाचून ती तशीच असतील का हा प्रश्न मनात आला. तरीही आम्ही तिघांनी Chandler's Caramel Coconut Latte, Rachel's Matcha Latte, Monica's Midnight Mocha Cold Brew tea मागवलं. चव कशी लागली याला महत्त्व न देता फक्त पिण्याचा आनंद घेतला.
खूप सारे फोटोज् काढून आठवणीही साठवल्यात आणि शेवटी तेथून बाहेर निघालो.
अक्षरा रात्रभर जन्काकडे थांबणार होती आणि सकाळ होताच पुढच्या प्रवासाला लागणार होती. तिने पुन्हा लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं आणि मला आणण्याची जबाबदारी जन्कावर सोपवली.

![]() |
| Image Source: Guelgram |

No comments:
Post a Comment